दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म दि. २३ डिसेंबर पासून भरण्यास सुरुवात ssc exam form filling starts from 23rd December
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म दि. २३ डिसेंबर पासून भरण्यास सुरुवात
ssc exam form filling starts from 23rd December
महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021
मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे आवेदन पत्र भरण्याची तारीख
बोर्डाकडून कळविण्यात आली.
परीक्षेत बसणारे
विद्यार्थी 23
डिसेंबर 2020
पासून ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. याअंतर्गत नियमित, पुनर्परीक्षण करणारे, नोंदणी प्रमाणपत्र
प्राप्त केलेले खासगी विद्यार्थी, तसेच
ग्रेड सुधार योजनेत प्रवेश घेतलेले आणि विषय असलेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू
शकतील.
माध्यमिक शाळा नियमित विद्यार्थी 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 पर्यंत सरल डाटाबेस
मधून ऑनलाईन अर्ज भरू शकतील.
नियमित , पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी
प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी(Private Repeater) तसेच
श्रेणी सुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना
परीक्षेसाठी 12 जानेवारी
ते 25 जानेवारी 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करता येणार आहे.
*************************************************
COMMENTS