GMRT Science Day 2021
GMRT Science Day 2021
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही GMRT विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस
साजरा करणार आहे. फक्त यावर्षी परिस्थितीनुसार डिजिटल माध्यमाद्वारे एक अनोखे ऑनलाईन
विज्ञान प्रदर्शन होणार आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या GMRT विज्ञान प्रदर्शना मध्ये सहभागी होण्याची, शाळा आणि महाविद्यालयांना ही एक सुवर्णसंधी आहे.
गेल्या 18 वर्षा पासून GMRT खोडद येथे राष्ट्रीय विज्ञान दिनी साजरा होणारे विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भारतातील
सर्वात मोठे विज्ञान प्रदर्शन आहे. दरवर्षी
शेकडो शाळा, महाविद्यालये आणि वेगवेगळ्या संस्था यामध्ये भाग घेतात
आणि दरवर्षी, दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी दर दिवशी भेट देतात.
COVID 19 च्या या वैश्विक संकटाच्या परिस्थिती मध्ये येणारा राष्ट्रीय विज्ञान दिवस (28 फेब्रुवारी 2021) ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार असून त्या निमित्ताने विज्ञान प्रयोगांचे ऑनलाईन प्रदर्शन
Growing Dots या Mobile App च्या माध्यमातून आयोजित करत आहे.
विद्यार्थ्यांचा नॉलेज मॅप विकसित कारण्यामध्ये अग्रेसर असणारी Indian Institute of Knowledge (IIK) ही संस्था शाळांच्या Real Time Digital Administration (संगणकीय व्यवस्थापन) साठीही काम करते.
Online Science Experiments Competition & Exhibition 2021
Inauguration:-
28th February 2021 at 9:30 am
Chief Guest:-
Smt. Sushma Taishete
Joint Secrectary
(Rescarch & Development)
Department of Atomic Energy
राष्ट्रीय विज्ञान दिवस (28 फेब्रुवारी 2021) ऑनलाइन पद्धतीने पहा.
LIVE
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
COMMENTS