निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम- भाषा व गणित (FLN)
निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम- भाषा व गणित
निपुण भारत अंतर्गत पायाभूत
साक्षरता व संख्याज्ञान
२०२६ पर्यंत
इयत्ता ३ री पर्यंतच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना मुलभूत वाचन व संख्या ज्ञानाची
सर्व क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोरोना कालावधीत झाळा बंद
असल्याने विद्यार्थ्यांचा अध्ययन र्हास (Learning Loss) झाल्याचे वेगवेगळ्या सर्वेक्षणामधून समोर आलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन लेखन
कौझवल्यांचे विकसन करून अध्ययन ऱ्हास (Learning Loss)भरून काढण्यासाठी शिक्षकांनी पालकांचे सहकार्य घ्यावे. माता पालक गटांची स्थापना करून
मुलांच्या अध्ययनामध्ये
त्यांचा सहभाग घेण्यात येत आहे. मार्च २०२२ मध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सर्वेक्षण घेण्यात आले. यामध्ये
आकलन, समजपूर्वक वाचन, वजाबाकी, बेरीज-वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे, भागाकार तसेच मापन इत्यादी
क्षेत्रांमध्ये इयत्ता ३ री च्या मुलांची संपादणूक कमी असल्याचे दिसून आले आहे.
मुलांना इयत्ता निहाय निश्चित केलेल्या
उद्दिष्टानुसार वाचन व लेखन क्षमता प्राप्त नसल्याचे शाळा भेटीतून दिसून येत आहे. निपुण भारत
अभियानचे उद्दिष्ट साध्य करणे तसेच मुलांचे वाचन - लेखन,गणन इ. कौशल्य विकसित व्हावीत याकरिता निपुण भारत अभियानाला पूरक अज्ञा
कृती कार्यक्रमांची
निश्चिती करण्यात आली आहे. इयत्ता १ ली ते ५ वीतील सर्व विद्यार्थ्यांचे
स्तरानुसार तीन गटात
वर्गीकरण करण्यात येणार असून दिवस निहाय निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमाची पुढील दोन महिने अंमलबजावणी करण्यात
येणार आहे. दोन महिने निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम राबविल्यानंतर या कार्यक्रमाची
परिणामकारकता तपासण्यासाठी इयत्ता १ ली ते ५ वीच्या १०० % मुलांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या सर्व
उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रम हा मा. मुख्य कार्यकारी
अधिकारी यांच्या संकल्पनेतून सुरु होत आहे. तरी सदर केंद्रस्तरीय परिषदेला मा.आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिला परिषद,पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, साधनव्यक्ती, विशेष शिक्षक यांनी स्वतः उपस्थित
राहायचे असून सोबत आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता १ ली ते
५ वी ला अध्यापन करणारे सर्व शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक यांना उपस्थित राहण्यास आदेशित
करावे.
निपुण भारत गुणवत्ता वृद्धी
कार्यक्रम या
कार्यक्रमासाठी कोण उपस्थित राहू शकतात ?
१) जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, साधनव्यक्ती, विशेष शिक्षक
२) जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील
इयत्ता १ ली ते ५वी ला अध्यापन करणारे सर्व शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक
कार्यशाळेचा दिनांक : ०८ / १२ / २०२२
वेळ : दुपारी ३:०० ते ४:३०
LIVE
COMMENTS